
पेट्रोल डिझेल, गैस ,सिलिंडरच्या दरवाढी विरोधात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल नागपुर शहर तर्फे इंदिरा माता नगर येथे पेट्रोल डिझेल, गैस ,सिलिंडरच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल अध्यक्ष नागपुर शहर सुरेश कर्णे यांच्या नेतृत्व आंदोलन केलेे गेले
पेट्रोल व गैस भाववाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील,महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष डॉ जानबा मस्के आणि नागपुर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी आंदोलन चे आवाहन केले होते
गेल्या काही दिवसात स्थिर असणोरे इंधनाची भाव परत वाढू लागले आहेत रहदारी कमी असली तरी माल वाहतूक सूरू आहे भाव वाढल्याचा फटका लहान मोठया व्यावसायिकांना बसला आहे सरकारने तातडीने भाववाढ मागे घ्यावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले
यावेळी आंदोलनात राममनोहर प्रसाद, अक्षय निमगडे ,रामभाऊ जीनागोसे ,भुमिता निमगडे, अशोक पाठक, मंजु गोरघोटे ,रेखा वारके, प्रकाश गौर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते