
पूर्व विदर्भ
भंडारा:बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
भंडारा,दि.20:- भंडारा जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना सुचित करण्यात येत आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 18008892816 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.
परराज्यातील स्थलांतरीत कामगार व इतर सर्व प्रकारच्या कामगारांच्या तक्रारींसाठी याच क्रमांकावर संपर्क करता येईल. कामगार विषयक विविध योजनांच्या माहितीसाठी देखील हाच नंबर असून कामगारांनी त्यांच्या अडचणींसाठी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त भंडारा उ. सु. लोया यांनी केले आहे.
0