महाराष्ट्र

खतांची दरवाढ रद्द झाली, आता प्रामाणिकपणे मोदींचे आभारही माना: चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले आहे, यासाठी त्यांनी केंद्र सरकारवर 14775 कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसला आहे

दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले पाहिजेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. डीएपी खतांच्या बाबतीत दरवाढीची समस्या निर्माण होण्यास तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरकारच कारणीभूत आहे, असा आरोप देखील पाटील यांनी यावेळी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!