
पश्चिम विदर्भ
वाशीममध्ये लॉकडाउन 27 मे पर्यंत वाढले,नवीन नियमावली जाहीर
वाशीम दि 20मे: वाशिम मध्ये शूरू असलेले कडक निर्बंध 27 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी यासंबधी आदेश निर्गमित केले आहे
नवीन नियमावली खालील प्रमाणे ….
कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणा शिवाय घराबाहेर पडता येणार नाही
किराणा,भाजीपाला,फळविक्रेते,डेयरी,पिठाची गिरणी आणि रेशनची दुकाने सकाळी 7 से सकाळी 11 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी
इतर सर्व दुकाने बंद राहतील
दारूची दुकाने आणि मास व अंडीची दुकाने बंद राहतील तथापि ते सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत घरपोच सेवा देऊ शकतात
हॉटेल,रेस्टॉरंट,खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील,ग्राहकांना स्वतः जाऊन पार्सल घेता येणार नाहीी
शेती अवजारे,उपकरणेे यांची दुकाने,कृषी सेवा केंद्रे सकाळी 7 ते सकाळी11 पर्यंत चालू राहू शकतील