
रिक्षाचालकांनो ही नोंदणी करा, बँक खात्यात 22 मे पासून जमा होणार ₹ १५००,कागदपत्रांची गरज नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेली परवानाधारक रिक्षाचालकांना करोना काळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया दि. २२ मे पासूनसुरू होत आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.
रिक्षाचालकांनी ऑनलाइन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दीड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी केली
परवानाधारक रिक्षाचालकांना २२ मे पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. कोणतीही कागदपत्रे सादर न करता संगणक प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षाचालकांच्या खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे. रिक्षाचालकांना हा मोठा दिलासा मिळणार असून नोंदणी करून तत्काळ मदद घ्यावी असे आव्हान राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे