
मोदींच्याऐवजी गडकरींना पंतप्रधान करा : नाना पटोले
देशभरात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना ही पंतप्रधान मोदी बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते,कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना त्याचं सोयरसुतक नाही, त्यांच्याऐवजी नितीन गडकरी पंतप्रधान (Nitin Gadkari Prime Minister) असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
नितीन गडकरी यांनी कोरोना लसीच्या वाढत्या मागणीवरुन दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन नाना पटोले यांनी टोमणा लगावला. नाना पटोले म्हणाले, “मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना त्यांच काही घेणे नाही”
भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही यावेळी नाना पटोले म्हणाले.