
नागपूरात म्युकरमायकोसिस (ब्लैक फंगस) चे 300रुग्ण,7 लोकांचा मृत्यू
नागपूर दि 18 मे :म्युकरमायकोसिस (ब्लैक फंगस) आजारांचं संक्रमण वेेगाने वाढत आहे
गेल्या काही दिवसांत नागपुरात सात जणांचा या आजाराने मृत्यू नोंदवला गेला आहे. इतकंच नाहीतर बुरशीचं संक्रमण झालेले ३०० हून अधिक रुग्ण सध्या शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेते आहेत.
आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या यादीतून याची माहिती समोर आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विदर्भात करोनाचे सर्वाधिक रुग्ण नागपुरात आहेत. त्यामुळे बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
काळ्या बुरशीची लागण झालेल्या रुग्णांपैकी १२९ रुग्णांवर जबडा, डोळे, कान- नाक- घशासह इतरही काही शस्त्राक्रिया झाल्या आहेत. यातील सर्वाधिक ४३ रुग्ण हे एकट्या मेडिकलमध्ये उपचाराला आले होते. तर सेव्हन स्टार रुग्णालय ४२, शासकीय दंत महाविद्याालय व रुग्णालय ३४, न्यूरॉन मिलेनियन रुग्णालयात ३३, मेयोत १९, न्यू ईरा रुग्णालय १६, अॅरियन्स इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंसेस १०, अर्नेजा हार्ट इन्स्टिट्युट ८ रुग्णांनी म्यूकरमायकोसिसचे उपचार घेतले.