महाराष्ट्र

महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाचा पहिला बळी,महिला ठार

तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पहिला बळी गेला असून यात महिला ठार झाल्याची घटना समोर आली आहे. भिंत अंगावर कोसल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

– घाटकोपर-विक्रोळी ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. रुळावर झाड पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

– रायगडमध्ये चक्रीवादळामुळे पहिला मृत्यू, भिंत कोसळल्याने महिलेचा गेला जीव

– खराब वातावरणामुळे चेन्नई-मुंबई विमान सुरतला वळवले

– चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणं बंद राहणार असल्याची माहिती, स.11 ते दु.2 पर्यंत उड्डाणं बंद राहणार

– पाचगणी, वाई, महाबळेश्वर परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका, विजेचे खांब, झाडं कोसळल्याने विजपुरवठा खंडित

– रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, घरांचं नुकसान

– पुढच्या 3 तासांत रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात 90-100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहरणार असून मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

– गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झालं आहे. मुलचेरा तालुक्यातील मोहूर्ली या गावात म्हशीच्या अंगावर झाड कोसळल्याने म्हैस जागीच ठार झाली आणि शेतकऱ्याच्या घराचे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!