पूर्व विदर्भ

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकची गोंदियातील बदलीला स्थगिती

गोंदिया दि 12 मे :एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक ( Daya Nayak) यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आलीय. दया नायक यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली होती. त्यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं होतं. पण आता दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात आलं होतं. नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली करत, त्यांची रवानगी गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात करण्यात आली होती.

कोण आहेत दया नायक ?

>> मुंबई पोलिसमध्ये सध्या PI म्हणून कार्यरत असलेल्या दया नायक यांच्याकडे जुहू एटीएसची जबाबदारी आहे.

>> 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

>> प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. 1998-99 पासून नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

>> 1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. आतापर्यंत जवळपास 80 एनकाउंटर दया नायक यांच्या नावावर आहेत.

>> दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती.

>> बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती.

>> 2012 साली दया नायक यांना सेवेत परत घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं.

>> त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या जुहूचौकी युनिटचे प्रमुख आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!