महाराष्ट्र

मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, एकजण पोलिसांच्या ताब्यात

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण (Facebook post) केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Police) एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला व्यक्ती हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.

राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. वडगाव शिंदे, हवेली) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने 7 मे रोजी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यानुसार त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. काकडे याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्याने घटनात्मक पदाचा आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य जाणून-बुजून केले आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह आणि बदनामीकार मजकूर टाकणाऱ्या 13 जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकास अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!