
पूर्व विदर्भ
वर्धेत लॉकडाउन 18 मे पर्यंत वाढवला
वर्धा दि 12 मे : वर्धेत 8 ते 13 मे पर्यंत सुरू असलेला लॉकडाउन 18 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे
यापूर्वी जिल्हयात 8 ते 13 मे याकालावधीसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. याचा परिणाम, जिल्ह्यात कोरोनाचा साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत होती. त्यामुळेच संसर्ग साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता.
18मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाउन लागू राहणार आहे, 8 ते 13 मे चे सर्व निर्बंध व अटी लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे