पूर्व विदर्भ

वर्ध्यात सापडला मुघलकालीन सोन्याचा खजिना; खोदकामावेळी सापडलं नाण्यांसह 4 किलो सोनं

वर्धा: वर्ध्यातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम करत असताना मुगलकालीन सोन्याचा खजिना सापडला आहे. खोदकामानंतर मातीचा ढिगारा शेतात टाकताना एका डबी सापडली. त्यात मुघलकालीन नाण्यांसह 4 किलो 28 ग्रॅम सोनं होतं. त्यात सोन्याचं बिस्किटही आढळून आलं.

ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि हा खजिना पाहण्यासाठी नाचणगाव येथे बघ्यांची एकच झुंबड उडाली. या घटनेचं वृत्त समजताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन हे सोनं ताब्यात घेतलं आहे

वर्ध्याच्या नाचणगाव येथे शेतकरी सतीश चांदोरे यांनी जुने घर विकत घेतले होते. जुन्या घराचं खोदकाम त्यांनी सुरू केले. खोदकामातील मातीचा ढिगारा शेतात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान हा ढिगाराही साफ करण्यात आला. हा कचरा साफ करताना मजुरांना एक डबी कचऱ्यात सापडली. डबीमध्ये सोनं आढळून आलं. त्यात एक सोन्याचं बिस्कीट आणि मुघलकालीन नाणे, कानातील रिंग असे एकूण 9 आभूषणे सापडली. 4 किलो 28 ग्रॅम वजनाचं हे सोनं आहे

पोलिसांनी हे सोन ताब्यात घेतलं. ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!