
पूर्व विदर्भ
वर्धेत टोटल लॉकडाउनचा प्रभाव, कोरोना संक्रमित संख्येत मोठी घट
वर्धा दि 10 मे: वर्धेकराना मोठी दिलासा देणारी बातमी
टोटल लॉकडाउनचा प्रभाव आज दिसून आला असून कोरोना संक्रमिताच्या संख्येत मोठी घट झाली आहे , लॉकडाउन पूर्वी रोज 1000पेक्षा जास्त कोरोना संक्रमित मिळत असताना आज ही संख्या 200 च्या घरात आली आहे
आज 10मे रोजी आलेल्या दैंनदिन कोरोना रिपोर्ट मध्ये 211 कोरोना संक्रमित आढले असून 24 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे .गेल्या 24 तासांत 1309 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 41,936 झाली असून सध्या 6448 ॲक्टिव पॉझिटिव्ह आहे