
पूर्व विदर्भ
वर्धेतील गीमा टेक कंपनीला भीषण आग, २५ कोटींचे नुकसानीचा अंदाज,13 कामगार बचावले
येरला येथील गीमाटेक्स इंडस्ट्रीज (Gematex Industries) या कंपनीला भीषण आग (fire) लागली. आगीत कॉटन बेल्स, सरकी, मशिनरी सह कंपनी आगीच्या विळख्यात सापडली. अग्निशमन दलाच्या पाच बम्बद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याच शर्थीचेे प्रयत्न सुरू आहे. या आगीत आगीत अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागली त्यावेळी जिनिंग खात्यात १३ कामगार काम करीत होते. हे सर्व कामगार प्रसंगवधान राखल्याने थोडक्यात बचावले. हिंगणघाटपासून २५ किलोमीटर अंतरावर वडकी जवळील येरला शिवारात राष्ट्रीय महामार्गावर गीमाटेक्स इंडस्ट्रीजचे जिनिंग युनिट आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीने अद्ययावत ही कापसावर प्रक्रिया करणारी कंपनी चार वर्षांपूर्वी येरला येथे स्थापन करण्यात आली