
Breaking News
अभिनेत्री कंगना रनौतला कोरोनाची लागण
शिमला : बॉलिवूडमधे कोरोना संक्रमण वाढत असून दीपिका पादुकोण आणि शिल्पा शेट्टी नंतर आता कोरोनाबाधितांच्या यादीत आता अभिनेत्री कंगनाच्या नावाची भर पडली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून हिमाचल प्रदेशमध्ये क्वारन्टाईन असल्याची माहिती तिने दिली आहे.
कंगनाने आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये लिहिलंय की, “मी स्वत:ला क्वारन्टाईन करुन घेतलंय. मला माहित नव्हतं की हा व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत आहेत. आता मी त्याला संपवणार आहे. आपण कोणीही अशा गोष्टींना थारा देऊ नका. जर आपण या गोष्टीला घाबरलो तर ते आपल्याला जास्त घाबरवतील. कोरोना हा फक्त एक फ्लू आहे, ज्याने काही लोकाच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. आपण त्याला संपवून टाकू. हर हर महादेव”