
ग्रामीण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोंढाळी (ता.काटोल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट
काटोल :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोंढाळी (ता.काटोल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली व वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला
देशमुख यांनी उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कोरोनाच्या अनुषंगाने रुग्णांना देत असलेल्या वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. रुग्णांना आवश्यक ती औषधे व सुविधा तत्काळ देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
नागपूरात कोरोनाने थैमान घातलं असून ग्रामीण भागातही तो चांगलाच फोफावला आहे,रुग्णांना औषधे व अन्य आवश्यक सुवेधीची कमतरता जाणवत आहे, या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांची ही भेट रुग्णांना दिलासा देणारी ठरण्याची शक्यता आहे