
महाराष्ट्र
खाजगी रुग्णालयातील लशीचे 250 पैकी 150 रू केंद्राला जातात: महापौर पेडणेकर
मुंबईकरांना मोफत लस मिळावी यासाठी माझ्या केबीनबाहेर आंदोलन करण्याऐवजी केंद्राला हे 150 रुपये घेऊ नका असं सांगत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजप नगरसेवकांना खडसावले.
खाजगी हॉस्पिटलमध्ये जी लस लोक 250 रुपयांना विकत घेतात त्यातील 150 रुपये केंद्राला जातात आणि 100 रुपये खाजगी हॉस्पिटल त्यांच्या व्यवस्थापनासाठी घेते. याव्यतिरीक्त महापालिका आणि राज्य सरकारच्या शासकिय लसिकरण केंद्रावर मोफत लसिकरण होते. मात्र, खाजगी रुग्णालयात ही लस 250 रुपये देऊन विकत घ्यावी लागते. त्यामुळे लस विकत घ्यायची असल्यास त्यातील 150 रुपये केंद्राकडे जातात.