
शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले
*वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग*
शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू.
*उच्च व तंत्र शिक्षण विभाग*
सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापण्यास मान्यता.
*सार्वजनिक आरोग्य विभाग*
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देणार
*कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग*
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरीत करण्याचा निर्णय.
*नगरविकास विभाग*
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण
*सहकार विभाग*
कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा