पूर्व विदर्भ

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टींग वाढवा – जिलाधिकारी दीपक कुमार मीना

गोंदिया,दि.5 : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरीता जबाबदारीने कामे करुन जास्तीत जास्त टेस्टींग वाढवावे. असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

5 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कोविड-19 संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत तुरकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. आरटी-पीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांवर भर देण्यात यावा. बाधित रुग्णांची टेस्ट 24 तासात येईल असे नियोजन करावे. बाधित रुग्णांबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. आरटी-पीसीआर तपासणीच्या प्रलंबीत केसेस आहेत. त्या प्रलंबीत केसेस येत्या सोमवारपर्यंत झीरो झाल्या पाहिजे याबाबत नियोजन करावे. रुग्णांच्या सेवेसाठी प्रत्येक रुग्णालयात ॲम्बुलन्स असायला पाहिजे. आज जिल्ह्यात 10 हजार रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट किट येणार आहेत त्याचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात व्हेंटीलेटर्स उपलब्ध अहेत, त्याची अडचण भासणार नाही. कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाला पूर्वपरवानगीशिवाय बाहेर काढता येणार नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बाधित व्यक्तीच्या बॉडीचे प्रोटोकॉल पाळण्यात यावे. कोरोना बाधित रुग्णांबाबत यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे. ऑक्सीजनचा टँकर लवकरच येणार आहे त्याचे नियोजन करावे. जाहिरात काढून रुग्णालयात मनुष्यबळ वाढविण्यात यावे. जिल्ह्यत ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत त्या ठिकाणी सोई-सुविधा उपलब्ध करुन रुग्णांची गैरसोय होणार नाही व कोणत्याही रुग्णाची तक्रार येणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. कोविन ॲपवर कार्यशाळा घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले

Mybhuminews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!