
स्वस्त धान्य दुकानात अन्न -धान्य उपलब्ध, ग्रामीण भागातही वाटप सुरु अन्य राज्यातील स्थलांतरीतांनाही लाभ
शहरातील अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यानी मे महिन्याच्या धान्याची उचल करावी
नागपूर : अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्याना एप्रिल व मे या दोन महिन्याकरीताचा धान्यसाठा शहर पुरवठा विभागातील ६८२ राशन दुकानात उपलब्ध करून देण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ज्या शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल २०२१ महिन्यातील धान्याची उचल केली आहे . त्यांनी मे महिन्याचे धान्य मोफत घ्यावे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल व मे दोन्ही महिन्यातील धान्याची उचल केली नाही. त्यांनी एक महिन्याचे धान्य मोफत घ्यावे, असे अन्नधान्य वितरण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गरिबांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनसाठी अनुज्ञेय असलेल्या धान्याव्यतीरिक्त प्रती सदस्य प्रतीमाह ५ किलो या प्रमाणे गहू व तांदूळ वितरणाकरीता मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी पात्र लाभार्थ्यानी अनुज्ञेय धान्य संबंधित रेशन ( स्वस्त धान्य दुकानातून ) दुकानांमधून प्राप्त करून घ्यावे.
प्रत्येक क्षेत्रातील स्थलांतरीतांना पोर्टेबिलीटी (Portability )सुविधेतर्गंत या योजनेचा लाभ घेता येईल. अन्य राज्यातील स्थलांतरितांना कार्ड दाखवून लाभ घेता येईल. या सुविधेतर्गंत धान्य स्वीकारणाऱ्या शिधापत्रिकाधारकांनी योजनेचा लाभ घ्यावा. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शिधापत्रिकांबाबत तसेच धान्य वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास हेल्प लाईन क्रमांक ०७१२-२५६५५२१ संपर्क साधावा.
ग्रामीण भागातही वाटप सुरू
कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकारने एक महिना आणि केंद्र सरकारने दोन महिन्याचे तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे ग्रामीण भागातही लाभार्थ्यांनाही मोफत धान्य मिळणार आहे शहरा सोबतच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्यातील ३२ लाख ५७ हजार १३१ नागरिकांना महिन्याकाठी प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे.
अन्नधान्य वितरण प्रणालीचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या ७७ हजार १४३ कार्डधारकांना ग्रामीणमध्ये तर ४४ हजार ६८८ रेशन कार्डधारकांना शहरी भागांमध्ये लाभ मिळणार आहे.
#Ration #FreeRation #GovernmentofMaharashtra #BreakTheChain