महाराष्ट्र

बंगालमध्ये भाजपला झटका, ‘ऑपरेशन लोटस महाराष्ट्राला धक्का बसणार’ ?;

2 मे नंतर महाराष्ट्रात  सत्ताबदल होईल असे महाराष्ट्र भाजपचे अनेक मोठे नेते जाहीरपणे सांगत होते पण बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच सत्ता परत येत    असल्याचे चिन्ह दिसत असून भाजपचा अपेक्षा भंग झाला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असं जाहीरपणे सांगितले होते.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर 2 मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीवर महाराष्ट्रातील सत्तांतर अवलंबून असल्याचं बोललं जात होतं.

मिशन बारगळणार?

भाजपचे नेते बंगालमध्ये चमत्कार होण्याची अपेक्षा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या रणनीतीद्वारे बंगालमध्ये सत्ता स्थापन करता येईल, अशी आशा भाजपला होती. त्यामुळेच बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. तसं भाजपचे नेतेही बोलून दाखवत होते. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.

त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असल्याने भाजप राज्यात सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न करेल याची शक्यता नाही. तसं झाल्यास भाजपच्या विरोधात जनमाणस जाऊ शकतं. त्यामुळे भाजप चुकूनही महाराष्ट्रात सत्तांतर करण्याचा प्रयत्न करणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!