
माझ्याा मते अजून कडक लॉकडाऊनची गरज नाही:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी आवश्यक कडक निर्बंध लावले असून माझ्यामते अजून कडक लॉकडाऊनची गरज नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना सांगितले
गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास दुष्परिणाम, अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर टाळा
गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतात, अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर करू नये ही माझी विनंती आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टर्स आणि कोविड सेंटर्सना केलेय.
रेमडेसिव्हीरच्या दररोज 50 हजार इंजेक्शनची आवश्यकता आहेत. केंद्रानं सर्व स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला केंद्रानं 43 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरवलीत. रोज 35 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळतात.
महत्वाचे मुद्दे
ऑक्सिजन प्लांटच्या जवळच जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न
शिवभोजन थाळीसाठी 5500 कोटींचं पॅकेज, पुढचे 2 महिने शिवभोजन थाळी मोफत ,4 कोटी लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला
तिसऱ्या लाटेच्या संकटाला तोंड देण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे.
#CMUddhavThackeray #Maharashtralockdown #NightCurfew #CoronaVirus #Vaccination
Mybhumi news…. मायभूमि न्यूज