
महाराष्ट्र
धक्कादायक ! मि. इंडीया मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचाही कोरोनाने घेतला बळी
मुंबई : कोरोना उद्रेकात अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचाही कोरोनाने बळी घेतला आहे.
बॉडी बिल्डिंगमधील मानाचा मि. इंडिया हा किताब पटकावणारा जगदीश लाड केवळ 34 वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने लाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जगदीशला काही दिवसापूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा इथं उपचार सुरु होते. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदशीसारख्या धष्टपुष्ट तरुणाला कोरोना हतबल करत असेल, तर जे कोणी कोरोनाला सिरियस घेत नसेल, त्यांनी आता पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.