
Breaking News
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी पुन्हा संवाद साधणार; काय संवाद साधणार याची उत्सुकता
राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे