
Breaking News
जुलै, ऑगस्टमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट : आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहीती देताना सांगितले की जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे कार्य करण्यात येत आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. तसेच येत्या जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाटण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.