
कोरोनाची तीसरी आणि चौथी लाट येणार,नितीन गड़करीचे मोठे विधान
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सज्ज राहा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहेे
नागपुरात गडकरींनी सांगितले की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारी कमी होत असली तरी तिसरी- चौथी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने देखील आपल्याला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे
त्यांनी कोरोणा योद्धांचे आभार मानताना सांगितले आपला आत्मविश्वास ढळू न देता अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये काम करावं लागतं आहे. आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहे. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहूू ,कोरोना विरुद्धची ही कठीण लढाई आपण लढत असताना एकमेकांना साह्य करून परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे असेही गडकरींनी यावेळी सांगितले