
ग्रामीण
पांच महिन्यापूर्वी लग्न झालेल्या 24 वर्षीय जवानाची आत्महत्या
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील लष्करी छावणी परिसरात शौचालयाच्या खिडकीला शॉल बांधून २४ वर्षीय जवानाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नवीन राम निवास असे मृत जवानाचे नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पोर्ट्स कोट्यातून तो लष्करात भरती झाला होता. पाच महिन्यांपूर्वीच नवीन याचे लग्न झाले होते. मंगळवारी सायंकाळी तो शौचालयात गेला तो परतलाच नाही. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो ‘गिनती’ला हजर झाला नाही. तो अनुपस्थित असल्याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर अधिकारी त्याच्या घरी गेले. तो घरी नव्हता. अधिकाऱ्यांनी शौचालयाची तपासणी केली असता नवीन हा गळफास लावलेला दिसला.
चनामा करून त्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला आहे. नवीन याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.