Breaking Newsमहाराष्ट्र

MAHARASHTRA LOCKDOWN : राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला!

राज्याला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन (maharashtra lockdown) लावण्यात आला आहे. पण आता लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे.त्यामुळे राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा 30 एप्रिल रोजी केली जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!