महाराष्ट्र

आजपासून करता येणार 18+ साठी लस नोंदणी : नोंदणी केल्याशिवाय नंबर येणार नाही, एका क्लिकवर सर्व माहिती

ज्या लसीचा प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयासह केंद्र सरकारनं लस मिळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया काय असेल, याबाबत माहिती दिलेली आहे.

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान 18 वर्षांवरील सर्व लोकांना 1 मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी 28 एप्रिल बुधवारपासून सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केलेय. 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेय. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. ज्या लसीचा प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयासह केंद्र सरकारनं लस मिळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया काय असेल, याबाबत माहिती दिलेली आहे.

आपला नंबर लसीसाठी कसा येईल?

1 मेपासून वय वर्षे 18 हून अधिक असलेल्यांना लस मिळणार आहे. त्यासाठीही कोविन वेब पोर्टलमार्फत नोंदणी करावी लागेल. नोंदणीबद्दलची अफवा पसरली होती. ती 24 एप्रिलपासून सुरू होईल, असं सांगण्यात येत होते. पण सरकारनं 24 नव्हे तर 28 तारखेपासून नोंदणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. आपण कोविन पोर्टलवर लॉगिन करून नोंदणी करू शकता https://selfregifications.cowin.gov.in/.

नोंदणी कशी करावी?

पीआयबीने सरकारच्या वतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिलीय. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.

येथे संपूर्ण प्रक्रिया

पोर्टलवर नोंदणीचा ​​एक पर्याय https://selfregmission.cowin.gov.in येथे असेल.

येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.

तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो 180 सेकंदात टाईप करावा लागेल.

नंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.

आधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी यांचा पर्याय आहे.

या पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या, नंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल. यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल.

केंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.

तुमचा नंबर आला की जा आणि लस घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!