
मुलीला दूध पाजताना व्हिडिओ शेअर कर ना , असं म्हणणाऱ्याला अभिनेत्री नेहा धुपियाचं जोरदार प्रतीउत्तर
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या मुलीला दूध पाजतानाचा फोटो शेअर केला आहे हा फोटो शेअर करत नेहाने त्यावर लिहिलं, ‘मी नेहमी अशा अनेक कमेंटना टाळते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. पण हे जगासमोर आणणं आवश्यक होतं कारण यांच्यासारख्या व्यक्तींमुळे संपूर्ण स्त्रीजातीसाठी आपल्याच मुलांना दूध पाजणं ही लाजिरवाणी गोष्ट बनते
एका युझरने नेहाच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं, ‘तू तुझा ब्रेस्टफीड करतानाचा व्हिडिओ पोस्ट करू शकतेस का? नम्र विनंती!!!’ ही अश्लील कमेंट सगळ्यांसमोर आणण्यासाठी तिने हा फोटो पुन्हा पोस्ट केला होता. पण त्यासोबतच आणखी एका युझरने त्यावर सणसणीत उत्तर देत लिहिलं, ‘मी तुझ्या पेजवर तुझ्या आई आणि आजीचे फोटो पाहू शकते. तू त्यांना सांग. त्या तुला दाखवतील.’ या सोबतच नेहाने कॅप्शन देत लिहिलं, ‘एका आईचा प्रवास फक्त तिलाच समजू शकतो. आपण सगळेच एक आनंदी असलेली बाजू पाहतो पण दुसरीकडे ती थकलेली आणि खूप जास्त जबाबदारी असलेली स्त्री असते. एक आई होणं खूप अवघड असतं तरीही ती सगळं करते जे आवश्यक आहे.’