
Breaking Newsमहाराष्ट्र
महाराष्ट्राला मोठा दिलासा! रोजच्या रुग्णसंखेत मोठी घट,आज ४८,७०० नवे कोरोना रुग्ण, ७१ हजार झाले बरे
आज राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ६५ हजार ते ७० हजारांच्या घरात वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ७०० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ६६ हजार १९१ इतकी होती. कालच्या तुलनेत आज मोठी घट झाली असून हा फरक १७ हजार ४९१ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७१ हजार ७३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ६१ हजार ४५० इतकी होती
आज राज्यात एकूण ५२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८३२ इतकी होती.