
नागरिकांना रेमडेसिवीर मिळावे यासाठी शिवसेनेच्या आमदारानं स्वत:ची 90 लाखाची एफडी मोडली
राज्यातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे आणि लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे,हिंगोली जिल्हा देखील या परिस्थितीला अपवाद नाही. हिंगोलीतही ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने कोरोनाबाधितांना आपला जीव गमावावा लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत
रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध व्हावा यासाठी कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला आहे.
संतोष बांगर यांनी स्वतःची एफडी मोडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी खाजगी वितरकाला 90 लाख रुपये उपलब्ध करुन दिले. या रकमेतून जिल्ह्यात 5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. बांगर यांच्या या प्रयत्नामुळे हिंगोल जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे
ज्या लोकांनी मला मोठं केलं त्या लोकांसाठी काम नाही केलं तर ते योग्य नाही. याशिवाय शिवसैनिकाला ते नाकारताही येणार नाही. त्यामुळे मी माझ्या खात्यातून आरटीजीएस करुन दिले, आता 960 इंजेक्शन हिंगोली जिल्ह्यासाठी आले आहेत”, अशी प्रतिक्रिया बांगर यांनी दिली.