
Breaking News
धक्कादायक ! कोविड केअर सेंटरमधून ३० करोना बाधित रुग्णांचे पलायन
यवतमाल जिल्हातील घाटंजी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल ३० करोना बाधित रुग्णांनी पलायन केले. दरम्यान, यापैकी काही रुग्णांना शोधून आता गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
शनिवारी घाटंजी तालुक्यात ४५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येते.शुक्रवारी आमडी येथे करोना चाचणी शिबीर घेण्यात आले. या ठिकाणी १७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढ़ले होते,त्यांना घाटंजी येथे आयटीआय कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.कोव्हीड सेंटर मध्ये असुविधा असल्याचे ओरड करत हे रुग्ण पळून गेले त्यातील काही रुग्ण पोलीस गुन्हा दाखल करेल या भिती ने परत आले तर काही रुग्ण अघापही गायब आहेत,प्रशासनाद्वारे त्यांचा शोध शुरू आहे