
मुंबई ऑन्कोकेअर या कैंसर डे-केअर साखळीस्वरूप संस्थेचे नागपूरात आगमन !
नागपूर दिनांक 4 डिसेंबर ( महानगर प्रतिनिधी )
मुंबई ऑन्कोकेअर या कर्करोगांवर अद्ययावत उपचार करणाऱ्या डे-केअर साखळीस्वरुप संस्थेच्या नागपूर शाखेचा उद्घाटन सोहळा दिनांक ४ डिसेंबर, २०२२ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडला.
या प्रसंगी नॅशनल कैंसर इन्सटीट्युट, नागपूर येथील वरिष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. आनंद पाठक: मुंबई ऑन्कोकेअरचे संचालक डॉ. आशिष जोशी, डॉ. वशिष्ठ मणियार, डॉ. प्रितम कळसकर आणि डॉ. क्षितीज जोशी; तसेच मुंबई ऑन्कोकेअरचे कर्करोगतज्ञ डॉ. चंद्रशेखर पेठे, डॉ. स्मित शेठ, डॉ. मंगेश मेखा, डॉ. प्रदिप केंद्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
“मुंबई ऑन्कोकेअर या कर्करोगांवर जागतिक दर्जाचे उपचार वाजवी दरात उपलब्ध करुन देणाऱ्या, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा संस्थेचं नागपुरात आगमन झालयं याचा मला अतिशय आनंद होत आहे”, असं डॉ. आनंद पाठक उद्घाटनप्रसंगी म्हणाले. नागपूर आणि आसपासच्या शहरांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि या रुग्णांना योग्य वेळी, योग्य निदान आणि उपचार वाजवी दरात मिळावे यांकरिता मुंबई ऑन्कोकेअरच्या नागपूरातील आगमनांच त्यांनी मनःपूर्वक स्वागत व्यक्त केलं.
डॉ. आनंद पाठक यांनी मुंबई ऑन्कोकेअर, नागपूरचे प्रमुख कर्करोगतज्ञ डॉ. मकरंद रणदिवे आणि संपूर्ण एम्ओसी टीमचे उद्घाटनप्रसंगी अभिनंदन केले.
डॉ. मकरंद रणदिवे यांनी नागपूरातील कर्करोगग्रस्तांना उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, सुरक्षित वातावरणात व वाजवी दरात उपचार उपलब्ध होतील असे आश्वसनही दिले.
मुंबई ऑन्कोकेअरचे कॅन्सर डे-केअर ही एक वेगळी संकल्पना आहे. ९०% केमोथेरपी या रुग्णांना डे- केअर तत्वावर देता येतात आणि त्याकरीता रुग्णांना २४ तास हॉस्पिटल अॅडमिशनची आवश्यकता नसते. त्यामुळे रुग्णांचा ट्रीटमेंट कंप्लायंस वाढतो. आमच्या कैंसर डे-केअर मध्ये सर्व “सेफ्टी प्रोटोकॉल्स” पाळले जातात. वेळेच्या आणि खर्चाच्या दृष्टिने कर्करोगग्रस्तांसाठी ही फारच दिलासादायक बाब आहे असंही डॉ. मकरंद रणदिवे यानी पत्रकारांशी बोलताना सांगीतले
मुंबई ऑन्कोकेअर, गेली ५ वर्षे मुंबई, व महाराष्ट्रात एकूण १४ डे-केअर सेंटर्स आणि १८ अनुभवी कर्करोगतज्ञ यांच्यासह रुग्णसेवेत कार्यरत असून आजवर दोन लाखांहून अधिक रुग्णांना उपचार देऊ केले आहेत.