Breaking Newsनागपूर

सीबीआयला सहकार्य केलं, आता कोव्हिड सेंटरला निघालोय : अनिल देशमुख

सीबीआयची टीम घरी सर्च करायला आली होती. त्यांना आम्ही सहकार्य केलं. आता मी नागपूरमध्ये जो कोरोना वाढतोय, तिकडे कोव्हिड सेंटरला भेट देण्यासाठी मी जात आहे,असे अनील देशमुख यांनी सीबीआई च्या दहा तासांच्या चौकसी नंतर बाहेर निघताना सांगीतले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (CBI raid on Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करीत त्यांच्या घरी छापेमारी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले.

दहा तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी, अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून बाहेर पडले. यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!