
गडकरी म्हणाले, विदर्भातील ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकी महाराष्ट्रचं तुम्ही बघा : अजित पवार
महाराष्ट्रात रोज हजारो नवे रुग्ण वाढत असल्यामुले ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विदर्भाच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. “मी गडकरींशी बोललो, ते म्हणाले विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असं अजित पवार म्हणाले.
व्हेंटीलेटर्ससाठीही गडकरींचा पुढाकार
नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याचे जाहीर केले होते. सध्याची परिस्थिती पाहून गडकरी यांनी व्हेंटिलेटर्सच्या पुरवठ्यासाठी स्वत:हून पढाकार घेतला होता.