
नागपूर
साधू वासवानी जयंती निमित्त शहरातील कत्तलखाने बंद
नागपूर दिनांक 21 नवंबर ( शहर प्रतिनिधी )
“साधू वासवानी जयंती” दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन नुसार शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 ला “साधू वासवानी जयंती” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन यांनी निर्गमीत केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.