
Breaking Newsमहाराष्ट्र
अनिल देशमुखांच्या घरी सीबीआईचा छापा,गुन्हा दाखल
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
100 कोटी खंडनी प्रकरणी अनील देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता,तत्कालीन मुंबई पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांनी अनील देशमुख यांच्यावर दरमहीने 100 कोटी खंडनी मागितल्याचा आरोप केला होता