नागपूर

राज्यातील पहिला MMDP क्लिनिक नागपूरला

हत्तीपायामुळे येणारे अपंगत्व टाळण्यास मदत होईल : आयुक्तांनी केले उदघाटन 

नागपूर दिनांक 4 ऑक्टोबर ( शहर प्रतिनिधी)

नागपूर महानगरपालिकेतर्फे मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे MMDP क्लिनिक (Morbidity Management and Disability Prevention)/ हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले. या क्लिनिकचे उद्घाटन मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे.

यापुर्वी हत्तीपायाची सर्व उपचार रुग्णांना हिवताप व हत्तीरोग विभाग, महाल येथे जाऊन द्यावे लागत होते. परंतू या MMDP क्लिीनिकमुळे त्यांना आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचाराची सुविधा मिळणार आहे. जेणेकरुन ते आपल्या पायाची योग्य काळजी घेऊ शकतील आणि त्यापासुन होणारे अपंगत्व टाळता येईल. सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

नागपूर महानगरपालिके अंतर्गत एकुण 984 हत्तीपायाचे रुग्ण आहेत.

झोन क्र. पुरुष स्त्री एकुण

1 13 27 40

2 15 26 41

3 38 66 104

4 30 37 67

5 74 123 197

6 39 62 101

7 34 58 92

8 66 102 168

9 30 63 92

10 46 36 82

385 600 984

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!