
प्रवासासाठी आता ई पास गरजेची, कशी काढाल
महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रवासासाठी ई पास सुरु करण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करून प्रवास करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल.
महाराष्ट्र पोलिसांनी संकेतस्थळावरून नागरिकांनी अर्ज करावा आणि ई पास काढून प्रवास करा असं आवाहन केलं आहे. ऑनलाइन ई पास काढण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी पोलिस स्टेशनची मदत घेऊ शकता असंही महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.
ई पास काढण्यासाठी तुम्ही https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा.
संकेतस्थळावर ‘apply for pass here’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
त्यामध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे ते निवडा.
तुम्हाला काही कागदपत्रे इथे जोडावी लागतील.
प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहेत याची माहिती द्या.
कागदपत्रांची माहिती एकत्रित घेऊन ती अपलोड करा.
कोणत्या कारणासाठी ई पास काढू शकता?
कुटुंबातील व्यक्तीचे लग्न, अंत्यविधी यासाठी ई पास घेता येतो.
आरोग्यसंबंधित तक्रार असेल त्यासाठी प्रवास करण्यासाठी ई पास मिळतो.
कोणाला ई पासची गरज नाही
अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ई पासची गरज नाही.