नागपूर

उत्तर नागपुरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरण वितरण १ ऑक्टोबरला

नागपूर दिनांक 29 सितंबर ( महानगर प्रतिनिधी)

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून, या अंतर्गत शनिवारी १ ऑक्टोबर २०२२ रोजी उत्तर नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय नितीन गडकरी यांच्या हस्ते सहाय्यक साधने वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम (ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने उत्तर नागपूर ३००० पेक्षा जास्त दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना सहायक उपकरण प्राप्त झाले नाही त्यांना सुद्धा पुढच्या दोन दिवस उपकरण कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे दिले जातील, अशी माहिती मनपा कडून देण्यात आली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे २७ फेब्रुवारी ते २० मार्च २०२२ या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील २७,३५६ वरिष्ठ नागरिक वयोश्री योजनामध्ये तसेच ७७८० दिव्यांगजन एडिप योजनामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. एकूण ३५१३६ लाभार्थ्यांना ३४.८३ कोटी रुपये किंमतीची उपकरणे वितरित केले जाणार आहेत.

उत्तर नागपूरमधील लाभार्थ्यांना केल्या जाणाऱ्या साहित्य वितरण कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!