नागपूर

सिकलसेल रुग्णांसाठी नागपुरात होणार बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर दिनांक 24 सप्टेंबर (प्रतिनिधी)

पूर्व विदर्भ आणि उत्तर नागपूर या भागामध्ये सिकलसेल थेलसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. यासाठी आवश्यक उपचार आणि औषधांचा खर्च मोठा असून तो कमी करण्याच्यादृष्टीने कार्य करण्यात येणार आहे.

सिकलसेल थेलसिमिया रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा महत्वाचा उपचार असून त्यासाठी नागपुराबाहेर जावे लागते. पूर्व विदर्भ आणि विशेषतः उत्तर नागपुरातील रुग्णांची संख्या आणि त्यांच्या सोयीसाठी नागपुरात बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

तर जास्तीत जास्त दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना अडीप आणि वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपुरात नव्याने प्रयत्न करून प्रत्येक लाभार्थी लाभान्वित केले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण केल्या जात असून, नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता दीक्षाभूमी, काछीपूरा चौक स्थित पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदान येथे आयोजित शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. परिणय फुके, खादी आयोगाचे संचालक जयप्रकाश गुप्ता, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, नाना शामकुळे, कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, सुधीर दिवे, उपायुक्त रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, साहायक आयुक्त किरण बगडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय मानकर, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी, माजी नगरसेवक सर्वश्री संदीप जाधव, संजय बंगाले, रमेश शिंगारे, भूषण शिंगणे, संदीप गवई, किशोर वानखेडे, निशांत गांधी, सुनील हिरणवार, प्रमोद चिखले, गोपाल बोहरे, प्रमोद तभाने, प्रकाश भोयर, लहुकुमार बेहते, दिलीप दिवे, नागेश मानकर, हेमंत पारधी, नितीश ग्वालबंशी, माजी नगरसेविका नंदा जिचकार, लता काडगाये, पल्लवी श्यामकुळे, संगीता गि-हे, विशाखा बांते, मीनाक्षी तेलगोटे, सोनाली कडू, वनिता दांडेकर, अश्विनी जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग जनांची सेवा करणे म्हणजे ईश्वरांची सेवा करण्याची संधी मिळाल्यासारखे आहे. आपण केलेल्या निस्वार्थ सेवेतून त्यांचा मिळालेला आशीर्वाद हेच आपल्या समाजकार्याचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक तथा दिव्यांग बांधव यांची सेवा करण्याची संधी मिळणे सौभाग्याचे आहे. या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या साहित्यांचा दर्जा हा उत्तम असून ही साहित्य पुढची अनेक वर्षे दिव्यांग आणि ज्येष्ठांचे जीवन सुलभ करण्यास सहाय्यक ठरतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

*प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचविण्यास कटिबद्ध : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे वैभव आहेत. आपल्या पुढच्या पिढीच्या सुखद भविष्यासाठी उमेदीच्या काळात अनेक खस्ता त्यांनी खाल्ल्या. त्यांचे कार्य आणि अनुभव समाजासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या या आधाराच्या काळात त्यांना आवश्यक साहित्य मिळावे व त्यांच्या जीवनात सुलभता यावी, दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी या योजना कार्यान्वित केल्या. समाजातील सर्व घटकांना लाभ मिळावा यासाठी पंतप्रधानांनी अनेक योजना तयार केल्या. त्यांच्या या योजनांचा लाभ समाजातील महत्वाचा घटक असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात घेतलेला पुढाकार ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.

नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून लाभान्वीत व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील ३९५० लाभार्थ्यांना आज साहित्य वितरित करण्यात येत असून कुणीही लाभार्थी यापासून वंचित राहू नये, यासाठी नव्याने लाभ मिळवून देण्याबाबत कार्य केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी मनपाद्वारे वितरित केल्या गेलेल्या साहित्याची माहिती दिली. ते म्हणाले की, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याला सोयीस्कर करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मनपा तत्परतेने कार्यरत आहे.

यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र दिव्यांग जणांना विविध सोयी सुविधा पुरविण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महानगरपालिका अतिरिक्त पन्नास हजार रुपयांची आर्थिक सहाय्यता प्रदान करते. नागरिकांसाठी अशा प्रकारची आर्थिक मदत देणारी नागपूर महानगरपालिका राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचे ही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मनपाच्या दुर्गानगर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार सहायक आयुक्त किरण बगडे यांनी मानले. मुकबधिरांसाठी कपील वासे यांनी सांकेतिक भाषेत संचालन केले.

 

*३९५० लाभार्थ्यांना साहित्य वितरित*

नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी मध्य नागपुरातील ३२२३ लाभार्थ्यांना साहित्य, उपकरणे वितरित करण्यात आले होते. शनिवारी २४ सप्टेंबर रोजी काछीपूरा चौक, पी. के. व्ही. मैदान दीक्षाभूमी येथे दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील ३९५० लाभार्थ्यांना रु ४ कोटीचे सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अडीपचे ३७२ आणि वयोश्रीचे ३५७७ लाभार्थी आहे. त्यांना ३०५२० उपकरण नि:शुल्क वितरित करण्यात आली.

 

*प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थ्यांना साहित्य प्रदान*

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय मा.श्री. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली.

यावेळी अरुण मानकर व परमानंद गोविंदराव यांना कृत्रिम पाय, लक्ष महेशकर यांना एमआर किट, आकाश उदगीर यांना स्मार्ट फोन, आनंदराव झोड व विमल वाघमारे यांना श्रवणयंत्र, भीमाबाई ठावरे यांना व्हीलचेअर, वसंत मानवटकर यांना दातांचा सेट, आश्व धामुरकर यांना सेलिब्रल पाल्सी चेअर आणि जितेंद्र भाऊराव यांना मोटराईज्ड ट्रायसिकल प्रदान करण्यात आले.

 

*राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे*

 

वॉकिंग स्टिक

श्रवण यंत्र

एल्बो कक्रचेस

व्हीलचेअर

ट्रायपॉड्स

क्वॅडपॉड

कृत्रिम मर्डेचर्स

स्पेक्टल्स

क्वॅकपॉड

स्पेक्टल्स

 

*एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे*

वॉकिंग स्टिक

एल्बो कक्रचेस

एझलरी कक्रचेस (कुबडे)

कृत्रिम अवयव

श्रवण यंत्र

ट्रायपॉड्स

क्वैडपोड

व्हीलचेयर

ट्रायसिकल (मॅन्युअल)

ट्रायसिकल (बॅटरी)

कॅलीपस

TLM कीट

ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता)

डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!