Breaking Newsमहाराष्ट्र

विद्यापीठांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन होनार :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 

राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं अशक्य आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले. प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नये, असं उदय सामंत म्हणाले. (Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant said remaining University exam will conduct online mode)

तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या.आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा होणार नाहीत

तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!