
Breaking News
“घरात राहायला सांगत होता मग तुम्ही का पाळलं नाही?” भाजपा महिला प्रवक्त्याचा नरेंद्र मोदींवर निशाना
देशात कोरोनाचा स्फोट होत असताना पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मोठ्या गर्दीच्या सभा होत आहेत. यावरून भाजपा प्रवक्त्यांनी एका चॅनेलच्या डिबेट शोवेळी स्वत:च्या पक्षालाच टार्गेट केले.
भाजपा प्रवक्त्या रितू रावत म्हणाल्या की, सुरक्षित अंतर ठेवा, घरात राहा. असं तुम्ही सांगत होता मग निवडणुका का घेतल्या? तुम्हीच हे पाळलं नाही. गंगास्नान का करायला दिलं? ऑक्सिजन नसल्याने अनेकांचे जीव जातायेत. या पृथ्वीवर माणसं शिल्लक नसली तर निवडणुकीचा काय फायदा? सरकार बनवलं जाईल, निवडणुका होतील पण त्यासाठी एक वेळ द्या.
मला भाजपा प्रवक्ते पदावरून काढलं तरी चालेल पण लोकं मरतायेत, औषधांची किंमत वाढतेय, मला याचा त्रास होतोय असं त्यांनी सांगितले.