नागपूर

सुनिधी चौहानच्‍या परफॉर्मन्‍सने नागपूरची तरुणाई झाली ‘क्रेझी’

नागपूर, 20 मार्च (महानगर प्रतिनीधी)

सजना जी वारी वारी, नी मै कमली, हलका हलका सुरूर, क्रेझी किया रे यासारख्‍या धडाकेबाज गीतांनी सुप्रसिद्ध हरहुन्‍नरी गायिका ‘देसी गर्ल’ सुनिधी चौहान यांनी तरुणाईला क्रेझी केले. खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाचा दिवस नाचगाण्‍याने चांगलाच गाजला.

केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतील खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या उत्‍तरार्धाचे शनिवारी ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्‍ये उद्घाटन झाल्यानंतर महोत्‍सवाच्‍या दुस-या दिवशी रविवारी प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्‍या गायनाने नागपूरकरांना भरभरून आनंद दिला. मोठ्या संख्‍येने तरुणाईने कार्यक्रमाला उपस्‍थ‍िती लावली.

नी मै कमली कमली गीताने सुनिधीने धडाकेबाज एन्‍ट्री घेतली. दोन वर्षाच्‍या काळानंतर भारतातला पहिला लाइव्‍ह शो मी नागपुरात करते आहे. त्‍यामुळे मला आज नागपुरात गाताना खूप आनंद होतो आहे, असे सुनिधी चौहान म्‍हणाली. सुनिधीने एकामागोमाग एक रॉकींग परफॉर्मन्‍सेस दिले. क्‍यु ना हम तो, प्‍यार की एक कहानी सुनो, मिल गयी आज आसमां से, एक मै और एक तु है, जागे रे मन कही, मेनु इश्‍क तेरा ले डुबा, मेरी बाहों मे दुनिया भुला दे, अशा अनेक गीतांवर तरुणाई थिरकली. टाळ्या आणि शिट्टयांनी परिसर दणाणून गेला.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. दुस-या दिवसाच्‍या आयोजनाचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. सर्व माजी महापौर कल्‍पना पांडे, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, मनिषा कोठे, मनिषा धावडे, महिला मोर्चा प्रमुख निता ठाकरे, माजी प्रमुख कीर्तीदा अजमेरा, एम्‍सच्‍या संचालक विभा दत्‍ता यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

प्रा. अनिल सोले या्ंनी प्रास्‍ताविक केले. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!