नागपूर

व्हीआयपीएलचा राजा’ गणेशोत्सवात कलावंताची मांदियाळी

नागपूर दिनांक 2 सप्टेंबर ( महानगर प्रतिनिधी)

दोन वर्षाच्या कालावधीनंतर आज गणराया निर्बंधमुक्त झाले असून कार्यक्रम देखील सुरू झाले, आयटी क्षेत्रात कामाचा ताण, महागाई आदी बाबी लक्षात घेता, आनंदाचे क्षण अनुभवता यावे यासाठी आनंदात हास्याचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हास्यव्यंग कवी अहसान कुरेशी यांनी केले.

नागपुरातील आयटी पार्क येथील विदर्भ इन्फोटेक प्रा. लि. या आयटी कंपनीतर्फे यावर्षी प्रथमच व्हीआयपीएलचा राजा हा गणेशोत्सव प्रारंभ केला आहे. त्यात आज हास्यव्यंग कवी अहसान कुरेशी, राजकुमार रॅन्चो, चित्रपटात आवाजाचे डबींग करणारे राहुल इंगळे आणि पॉप गायिका शण्मुख प्रिया यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्हीआयपीएलचे प्रबंध संचालक प्रशांत उगेमुगे यांनी पत्रपरिषदेत दिली.

एक प्रश्नाला उत्तर देताना एहसान कुरेशी म्हणाले, मागील दोन वर्ष लोकांनी खूप दुःख सोसले. त्या काळात त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवण्याची खूप मोठी जबाबदारी आम्हा हास्य कालावंतावर होती. आमची दुःख बाजूला सारून आम्ही हे काम केले.

यासंदर्भात बोलताना प्रशांत उगेमुगे यांनी, मुंबईच्या धर्तीवर नागपुरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आयटी क्षेत्रात कार्यरत बहुतांश कंपन्या याठिकाणी आहेत, कर्मचारी आणि अधिका-यांना या काळात आनंदाचे क्षण अनुभवता यावे यासाठी आम्ही ही परंपरा सुरू केल्याचे सांगितले.

या दरम्यान व्हाईस ऑफ नागपूर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात मोठी बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे. याठिकाणी आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गणेशोत्सवासाठी हा संपूर्ण परिसर सजविण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मुख्य म्हणजे आमचे कर्तृत्व जगापुढे आणण्याचे काम नागपूरच्या जनतेने केले अशी माहिती राजकुमार रॅन्चो यांनी दिली. यावेळी राहुल इंगळे यांनी विविध प्राण्यांच्या आवाजात मिमिक्री करुन दाखविली तर शण्मुख प्रिया यांनी शराबी या चित्रपटातील ‘इंतहा हो गयी इंतजार की’ हे गीत पॉप स्टाईल ने सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!