नागपूर

पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या! बावनकुलेंचा समावेश नाही, सूत्रांची माहिती

महाराष्ट्र दिनांक 8 ऑगस्ट ( प्रतिनिधी)

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात १५ ते १७ जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून ९ नावं चर्चेत आहेत.

मात्र यामध्ये माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांच्या नावांचा समावेश नाही. या चारही नेत्यांना अद्याप मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात कोणताही फोन आलेला नाही.

प्रविण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती. मात्र भाजप पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरणार असल्याचं दिसत आहे. विधान परिषदेतील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, असं भाजपनं ठरवलं आहे. त्यामुळे दरेकर, बावनकुळे, शिंदे आणि पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून ९ ते १२ जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, सुरेश खाडे या सहा जणांना मुंबईतून फोन गेला आहे. त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी सहा जणांची नावं निश्चित झाल्याचं दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!