नागपूर

कळमना मार्केट ते जुना कामठी मार्गावरील उड्डाणपलाबाबत अधिसूचना जारी

नागपूर दिनांक 6 ऑगस्ट ( शहर प्रतिनिधी)

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांचे तर्फे मेसर्स तारा प्रोजेक्ट यांचे कडून कळमना(मार्केट यार्ड) ते जूना कामठी मार्गावर उड्डापूलाचे बांधकाम 24 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

या भागात कळमना मार्केट असल्याने या मार्गावर जड वाहनांची दिवसभर व्यस्त वाहतूकीची वर्दळ असते. रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नये, तसेच रोडवर गंभीर व प्राणांतिक अपघात होऊ नयेत, त्यावर प्रतिबंध व्हावा यासाठी या दरम्यान रोडवर वाहतूकीचे दृष्टीकोनातून अधिसूचना काढण्यात आली आहे.

कामठीकडे जाणारी जड वाहतूक ही कळमना मार्केट उजवेवळण घेवून चिखली चौक, सरळ ॲटोमोटीव्ह चौक, उजवेवळण कामठी रोड, तसेच कामठी रोडकडून येणारी जड वाहतूक ही कामठी येथून सरळ ॲटोमोटीव्ह चौक, डावेवळण, चिखली चौक, कळमना चौक डावेवळण घेवून कळमना मार्केटकडे जाईल.

ही अधिसूचना 4 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2022 पर्यंत अमलात राहील. शहरातील वाहनचालकांनी या अधिसूचनेचे पालन करुन होणारी गैरसोय टाळावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे आव्हान करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!