नागपूर

75 प्रकारांच्या तांदूळापासून 75 भाताचे प्रकार करून विश्वविक्रम स्थापित करण्याचा विष्णू मनोहर यांचा संकल्प

नागपूर दिनांक 13 जुलै ( महानगर प्रतिनिधी )

नागपूरचे भूषण विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत जवळपास 11 विश्व विक्रम केले आणि यावर्षी भारताच्या स्वातंत्राला 75 वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने 75 प्रकारांच्या तांदूळापासून 75 भाताचे प्रकार करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यात त्यांना ५ तासाचा कालावधी लागेल. हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2022 रोजी विष्णूजी की रसोई, सेंट्रल बाजार रोड, बजाज नगर चौक, नागपूर येथे होणार आहे.

प्रत्येक भात जवळपास 5 किलो तयार केला जाणार आहे, म्हणजेच एकूण 375 किलो भात यावेळात तयार होईल. हा तयार झालेला भात सर्व खवय्यांसाठी मोफत वितरीत केला जाणार आहे. यातील काही भाग हा विशिष्ट मुलांच्या शाळा, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अंधविद्यालय इत्यादी ठिकाणी वितरीत केला जाणार आहे.

75 प्रकारच्या तांदूळाचे वाण गोळा करणे हे काही सोपे काम नाही त्याकरीता लातूरचे आमचे मित्र दिनेश मित्तल (मित्तल राईस वल्ड) याचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. असे 75 प्रकारचे तांदूळ लोकांना बघायला सुद्धा मिळणार आहेत.

तांदूळाचे नाव, जात प्रदेश आणि यापासून कुठला पदार्थ तयार होत आहे यांची विस्तृत माहिती लोकांना पुरविण्यात येईल. त्याचवेळी विष्णूजी याच तांदूळापासून भाताचे प्रकार तयार करत असतील. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी लोकांनी आपले घरचे डब्बे सोबत आणावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!