महाराष्ट्र

बावनकुळे अचानक अजित पवार यांच्या भेटीला, चर्चा सुरू, चर्चेला उधाण

महाराष्ट्र दिनांक 20 जून ( प्रतिनिधी)

चुरशीची विधान परिषदेची निवडणूक चालू असतानाच भाजपचा एक मोठा नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आणि त्यांच्यात चर्चा सुरू असल्याने चर्चेला उधाण आले आहे

भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान, अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते.

आमचेच उमेदवार जिंकतील असे सांगत बावनकुळे यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वांसाठी उपलब्ध असायचे. आताचे मुख्यमंत्री कुठे असतात, कोणाला भेटतात. यामुळे आमदारच त्याचा बदला घेतील असे बावनकुळे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!